Saturday, 10 September 2016



रायरेश्वर किल्ला

रायरेश्वर किल्ला Raireshwar Fort – ४००० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील वाई-सातारा डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.
पुण्याहून साताऱ्याकडे जाताना ५१ कि.मी. वर भोर आहे आणि भोर – आंकाडे २२ कि.मी. तेथून ८ कि.मी. असे एकूण ८१ कि.मी. वर १५०० मीटर उंचीच्या एका विस्तृत पठारावर हे प्राचीन शिवस्थान आहे. महाराष्ट्रात एवढ्या उंचीवर असणाऱ्या काही निवडक पठारांमध्ये रायरेश्वर हे प्रसिद्ध पठार आहे.
पाचगणीचे टेबललॅन्ड सर्वांनाच माहितच असते मात्र त्याच्यापेक्षाही उंच आणि लांब असे टेबललॅन्ड म्हणजे रायरीचे पठार. भोरपासून ८ कि.मी अंतरावर असणारे हे रायरीचे पठार पुण्याहून एका दिवसात पाहून येण्यासारखे आहे. दाट झाडी, खोल दऱ्या, उंचच्या उंच सुळके, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, लांबच लांब सोंडा आणि आडवळणी घाट. यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे.
इतिहास : शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली ती याच रायरेश्वराच्या डोंगरावर. मात्र ही घटना काल्पनिक आहे की करी याबद्दल निश्चित विधान मांडता येणार नाही.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : रायरेश्वरावर पाहण्यासारखे फार काही नाही. रायरेश्वराचे पठार ५ ते ६ कि.मी. पसरलेले आहे. त्यामुळे या पठारावरील वर्षाऋतुत पाहण्यासारखे असते. रायरेश्वरावर शंभुमहादेवाचे मंदिर लक्षात येत नाही. पठारावर अलिकडेच गावं वसलेली आहेत. पठारावर भात शेतीचे प्रमाणही मोठे आहे. पांडवगड, वैराटगड, पाचगणी, महाबळेश्वर, कोल्हेश्वर, रायगड, लिंगाणा, राजगड, तोरणा, सिंहगड, विचित्रगड, पुंरदर, रुद्रमाळ, चंद्रगड, मंगळगड हा सर्व परिसर येथून दिसतो.
गडावर जाण्याच्या वाटा : रायरेश्वराला जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्याही मार्गाने जायचे झाल्यास भोर गावं गाठावे.
१. टिटेधरण कोर्लेबाजूने:पुण्याहून भोरमार्गे आंबवडे गाठावे. तेथून टिटेधरण कोर्लेबाजूने रायरेश्वरावर जाता येते. वेळ साधारण ३ तास लागतात. वाट काही ठिकाणी अवघड आहे.
२. भोर-रायरी मार्गे:भोर गावातून रायरी गावासाठी सकाळी अकरा व सायंकाळी ६ वाजता (मुक्कामाची) गाडी येते. याच वाटेला सांबरदऱ्याची वाट म्हणून देखील संबोधतात. या वाटेने रायरेश्वर गाठण्यास दोन तास लागतात.
३. केजंळगडावरुन :केजंळगडावरुन सूणदऱ्याने किंवा श्वानदऱ्याने सुद्धा रायरेश्वराला जाता येते.
रायरेश्वरावर मंदिरात किंवा गावात १० ते १२ जणांची राहण्याची सोय होऊ शकत. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. पिण्याच्या पाण्याची सोय बारामही उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment